Shravan Somvar 2020 Marathi Messages: यंदा 21 जुलै पासून श्रावणाची सुरुवात होत आहे. असं म्हणतात की हा श्रावणाचा महिना भगवान श्री शंकर यांच्या आवडीचा महिना असतो. म्हणूनच या महिन्यातील सोमवारी (शंकराचा वार म्हणून खास) महादेवाची पूजा केली जाते, दरवर्षी ज्योतिर्लिंग मंदिरात या निमित्ताने अनेक भाविक भेट देतात, मात्र यंदा कोरोनामुळे बाहेर जाऊन मंदिरात पूजा करणे शक्य होणार नाही. अशावेळी घरीच श्री शंकराचे पूजन करून तुम्ही तुमच्या मनोकामना व्यक्त करू शकता. सोबतच तुमच्या अन्य नातेवाईकांना, प्रियजनांना शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांचा दिवस सुद्धा खास करू शकता. यासाठी आम्ही तयार केलेले हे श्रावण सोमवार विशेष मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings तुमच्या Whatsapp Status, Facebook व अन्य सोशल मीडिया च्या माध्यमातून शेअर करू शकता.
यंदाची श्रावणी सोमवार तारीख आणि शिवमूठ याविषयी जाणून घ्या
श्रावण सोमवार मराठी शुभेच्छापत्र
शिव सत्य आहे.
शिव सुंदर आहे.
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे.
श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
तुम्हा सर्वांवर श्री शंकराची कृपा कायम राहो
पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
ॐ नमः शिवाय
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
बेलाचे पान वाहून महादेवाला करू वंदन
सदैव सुखी ठेव माझे सारे प्रियजन
श्रावणी सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा
श्रावण मास होता सुरु, शिवशंकराची पूजा करू
शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद राहो या सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा
श्रावण सोमवार चे व्रत करण्यामागे कारण असे की, समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष भगवान शंकराने प्राशन केले आणि मनुष्यावरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी पूजा, उपवास करून आदर व्यक्त केला जातो. पुराण कथांनुसार पार्वतीनेही श्रावण महिन्यात उपवास करून शंकराला प्रसन्न केले आणि विवाह केला. त्यामुळे इच्छित वर प्राप्तीसाठी देखील कुमारिका श्रावणी सोमवारचे व्रत करतात.