Shivtej Din 2020 (PC - File photo)

Shivtej Din 2020 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालामध्ये काही हजार मावळ्यांच्या साथीने शाहिस्तेखानाला सळो की पळो करून सोडलं होतं. आजदेखील शत्रूशी लढताना हीच शिवरायांची रणनिती वापरली जात आहे. लालमहालात झालेले हे युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. शिवरायांच्या स्वप्नातील हिंदुस्थान घडविण्यासाठी त्यांचे विचार प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केली आणि लालमहालावर पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकाविला. या घटनेचा आनंदोत्सव शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्या साधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना शिवतेज दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - April 2020 Festival Calendar: यंदा एप्रिल महिन्यात राम नवमी, ईस्टर संडे ते अक्षय्य तृतीया सणाची धूम; पहा सण, व्रत वैकल्यांची संपूर्ण यादी)

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2020 (PC - File photo)

शिवतेज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

Shivtej Din 2020 (PC - File photo)

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

सर्व शिवभक्ताना शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2020 (PC - File photo)

सिंहाची चाल… गरुडाची नजर...

स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन...

असेच असावे मावळ्यांचे वर्तन…

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण...

जय शिवराय... शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2020 (PC - File photo)

जगणारे ते मावळे होते...जगवणारा तो महाराष्ट्र होता

स्वत:च्या कुटुंबाला विसरुन

जनतेवर मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2020

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

जय भवानी…. जय शिवाजी

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2020 (PC - File photo)

शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. 1870 साली शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. हा शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. शिवतेज दिनी शिवाजी महाराजांच्या विविध किल्लावर शिवतेज दिन साजरा केला जातो.