यंदा मार्च माहिन्यात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, चैत्र नवरात्री यांचं स्वागत केल्यानंतर आता 2020 मधील ग्रेग्ररियन कॅलेंडरचा चौथा महिना म्हणजे 'एप्रिल' महिन्याला सुरूवात होत आहे. मागील 15 दिवसांपासून भारतासह जगभरात कोरोना व्हायरस संकटाचं सावट असल्याने सणांच्या सेलिब्रेशनचं, धामधुमीचं स्वरूप कमी आहे. परंतू घरच्या घरी भारतीय संस्कृतीचा भाग म्हणून सण आणि उत्सव साजरे केले जात आहेत. त्यानिमित्ताने उपवास, व्रत वैकल्यं केली जात आहेत. यंदा एप्रिल महिन्याची सुरूवात चैत्र नवरात्री मधील महाअष्टमीने होत आहे. त्यापाठोपाठ राम नवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. मग पहा यंदा एप्रिल महिन्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या सणांचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे.
चैत्र नवरात्रीचा शेवट राम नवमी दिवशी म्हणजे 2 एप्रिलला होणार आहे. चैत्र महिना हा हिंदू नववर्षातील पहिला महिना आहे. त्यामुळे नववर्षातील पहिल्या उत्सवाची सांगता 2 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात अक्षय्य तृतीया देखील साजरी केली जाणार आहे. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे.
एप्रिल 2020 महिन्यातील सण समारंभ
2 एप्रिल - राम नवमी
3 एप्रिल - छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
4 एप्रिल - कामदा एकादशी
6 एप्रिल - महावीर जयंती
8 एप्रिल - हनुमान जयंती
10 एप्रिल - गुड फ्रायडे
11 एप्रिल - संकष्टी चतुर्थी
12 एप्रिल - ईस्टर संडे
14 एप्रिल - डॉ. आंबेडकर जयंती
18 एप्रिल - वरूथिनी एकादशी
26 एप्रिल - अक्षय्य तृतीया
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. त्यामुळे हिंदू बांधवांमध्ये त्यांचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान हे अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारे आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार काही गोष्टींचे दान करते.