Shivrajyabhishek Din 2022 Images: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा तिथीनुसार 349 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. यानिमिताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला राज्यभारतून अनेक शिवभक्त उपस्थित राहतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
तिथीनुसार शिवराजाभिषेक सोहळ्याच्या Wishes, Greeting, Messages पाठवून शिवप्रेमींना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज उपयोगात येतील. (हेही वाचा -Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमेनिमित्त Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनींना द्या खास मराठी शुभेच्छा!)
इसवी सन 1674 मध्ये भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होय. परकीय शत्रूंना धूळ चारणारे शिवछत्रपती महाराज यांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे भारतातील परकीय सत्तांना एक प्रकारे दिला गेलेला इशाराच होता.