Chhatrapati Shivaji Maharaj | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आज राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din 2021). कोरोना व्हायरस महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा आज (6 जून) रायगड येथे पार पडला. कोरोना व्हायरस महामारीमुळे रायगडावर गर्दी न करता शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा घरोघरी साजरा करावा, असे अवाहन राज्य सरकारद्वारे करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी हा सोहळा घरोघरी साजरा केला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक केला. राज्याभरात शिवराज्याभिषेक हा दिन साजरा केला जात आहे. राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत समाजमाध्यमांतून छत्रपती शिवरायांची विविध चित्रे (Pictures of Shivaji Maharaj) शेअर करण्यात येत आहे. जळगाव जिल्हा माहिती विभागाकडूनही अशीच काही चित्रे ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहेत. आपण ती पाहित का?

रायगड येथे कोल्हापूरचे राजर्षी शाहू संस्थानाचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. या वेळी शिवकालीन नाणी आणि आता दुर्मिळ वस्तुंमध्ये समावेश असलेल्या 'सूवर्ण होन' चलनांचा अभिषेक करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गैरवशाली इतिहासाचा उल्लेख करतानाच मराठा समाजाच्या विविध मुद्द्यांवरही भाष्य केले.

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. किल्ले रायगड येथे आज (6 जून) हा सोहळा साजरा झाला. आजच्या दिवशी प्रतिवरषीच हा सोहळा साजरा होत असतो. मात्र, गेल्या वर्षी आणि यंदाही कोरोना व्हायरस संकटामुळे या सोहळ्यावर काहीशा मर्यादा आल्या. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. (हेही वाचा- Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा, Wishes, Quotes द्वारे देऊन शिवछत्रपतींना करा त्रिवार मुजरा)

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या जिद्द, बुद्धी, चातुर्य आणि संयमानं स्वराज्य स्थापन केले. त्याची आज इतिहासाने दखल घेतली आहे. त्या काळी सर्वसत्ताधीषांपैकी एक असलेल्या औरंगजेबाशी टक्कर देत स्वराज्य स्थापन करणे साधी गोष्ट नव्हती. परंतू, छत्रपती शिवरायांनी ते करुन दाखवले. तसेच, आपला राज्याभिषेक करत शिवरायांनी जगालाही एक स्वतंत्र राज्य स्थापन केल्याचे दाखवून दिले.