Shiv Jayanti | File Image

महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 19 फेब्रुवारी हा जन्मोत्सवाचा मुख्य दिवस आहे. यंदा शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र जमून मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळा साजरा करणार आहे. महाराष्ट्र सरकार कडून तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मग हाच शिवजयंतीचा आनंद सोशल मीडीयातही साजरा करण्यासाठी तुम्ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Wishes, Messages, WhatsApp Status, Stickers, GIFs शेअर करत हा आनंद द्विगुणित करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, द्रष्टे प्रशासक आणि कुशल संघटकही होते. जात-पात, धर्म यांचा भेदाभेदा न करता समाजातील सार्‍या घटकांची मूठ बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ माता आणि शहाजी राजेंकडून त्यांच्यावर संस्कार झाले. परकीय आक्रमणांना परतून लावत त्यांनी स्वराज्याची स्थापन केले. शिवरायाचं व्यक्तिमत्त्व आजही सार्‍यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे यंदाच्या शिवजयंती दिनी त्यांना अभिवादन करून या शुभेच्छा नक्की तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांपर्यंत पोहचवा. नक्की वाचा:  Shivgarjana Lyrics in Marathi: जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ

शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shiv Jayanti | File Image

निश्चयाचा महामेरु,|

बहुत जनांसी आधारु|

अखंड स्थितीचा निर्धारु|

श्रीमंत योगी||

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shiv Jayanti | File Image

जन्मदिन शिवरायांचा

सोहळा मराठी अस्मितेचा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti | File Image

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या भल्यांच्या मती

अरे मरणाची कुणाला भीती

आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

Shiv Jayanti | File Image

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti | File Image

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात

तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे

आणि त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्यामुळे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवनेरी गडावर शिवजयंती सोहळा साजरा करतात. महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील साजरी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 1869 साली रायगडावरील शिवरायांच्या समाधींचा शोध लागल्यानंतर पुढील वर्षापासून ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्वातंत्र्यचळवळीमध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी शिव जयंती साजरी केली आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचे इतिहासात दाखले आहेत.