शिवजयंती 2022 । PC: File Image

Shiv Jayanti Wishes in Marathi 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj). महाराष्ट्र शासन ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करते. यानिमित्ताने शिवनेरी गडावर खास शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. पाळणा गाऊन शिवरायांचा जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोनाचं संकट थोडं आटोक्यात असल्याने शिवप्रेमींसह उत्साहात हा शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिवजयंतीचे कार्यक्रम केले जाणार आहेत. मात्र सोशल मीडीयामध्ये या सणानिमित्त शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी शिवजयंती विशेष मराठी संदेश, शुभेच्छा, मेसेजेस, GIFs, Images शेअर करून तुम्ही हा दिवस शिवमय करू शकता. त्यासाठी टीम लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही WhatsApp Status, Banner, Facebook Messages द्वारा देखील शेअर करू शकता.

महाराष्ट्रात स्वातंत्र्यचळवळी दरम्यान लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी जे दोन सण निवडले होते त्यापैकी एक शिवजयंती होता. शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीयांना एकत्र करून त्यांचे प्रबोधन करून इंग्रजांविरुद्धचा लढा त्यांनी प्रबळ केला. या निमित्ताने शिवरायांच्या कथा सांगितल्या जातात. पोवाडे गायले जातात.(Rangoli Designs for Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: शिवरायांच्या जयंतीनिमित्त काही खास रांगोळी डिझाइन्स, पाहा व्हिडीओ)

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती 2022 । PC: File Image

ज्या मातीत जन्मलो तिचा

रंग सावळा आहे.

सह्याद्री असो वा हिमालय,

छाती ठोक सांगतो

मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती 2022 । PC: File Image

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात

तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे

आणि त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती 2022 । PC: File Image

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

जय शिवराय!

शिवजयंती 2022 । PC: File Image

जन्मदिन शिवरायांचा

सोहळा मराठी अस्मितेचा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती 2022 । PC: File Image

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या भल्यांच्या मती

अरे मरणाची कुणाला भीती

आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष मानले जातात. त्यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत मराठ्यांना, मराठी जनतेला मायेचं छत्र दिलं. स्वाभिमान पुन्हा मिळवून दिला. मात्र याच्या बदल्यात त्यांनी कोणत्याही धर्माला, जातीला धक्का न लावता आणि स्त्रियांचा आदर राखत स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे युद्धनीती, समाजकारण यापुरता त्यांचं व्यक्तिमत्त्व मर्यादित नव्हतं तर त्यांनी माणूस म्हणूनही अनेक लहान सहान गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून आपल्याला दिल्या आहेत त्या जपणं आवश्यक आहे.