छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 रांगोळी डिझाइन्स : 19 फेब्रुवारी 2022, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना शिवाजीराजे भोसले म्हणून ओळखले जाते, यांची 392 वी जयंती आहे. महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा केली जाती. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजा आणि भारताच्या इतिहासातील नैतिक हिंदू शासक असल्याने लोक हा दिवस उत्साहात साजरा करतात. शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 मध्ये पुण्यात प्रथमच कार्यक्रम घेऊन केली. शिवाजी महाराज हे एक शूर मराठा योद्धा होते ज्यांनी हिंदू धर्मासाठी आयुष्य समर्पित केले
छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात आणि प्रशासनात फारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृतच्या वापराला प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य प्रदेश काबीज केले राजे कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नव्हते. महाराष्ट्रात शिवजयंतीला सार्वजनिक सुट्टी असते आणि लोक विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून, महाराजांच्या महान इतिहासाचे वाचन करून तसेच त्यांच्या सन्मानार्थ मिरवणुका काढून हा सण साजरा करतात. शिवाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त, आम्ही खाली काही सुंदर रांगोळी डिझाइन कल्पना घेऊन आलो आहोत.