Shiv Jayanti 2020: शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे आकर्षक मराठमोळे  Whatsapp Stickers येतील कामी; सोप्प्या स्टेप्स वापरून करा डाउनलोड
Shiv Jayanti WhatsApp Stickers ( Photo Credits: Google Play Store)

Shiv Jayanti Wishes In Marathi: दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा आज म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapti Shivaji Maharaj Jayanti)  जयंती साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येकाच्या मनातील आदराची जागा आणि भावनिक ओढ पाहता हा सोहळा अत्यंत धामधुमीत साजरा होईल यात काही संशय नाही. मोठमोठे कायर्क्रम आयोजित करून, रॅली काढून दरवर्षी हा शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जातो, तसाच तो आजही साजरा होईलच मात्र अलीकडच्या डिजिटल जगात कोणत्याही दिवसाच्या शुभेच्छा ऑनलाईन दिल्या नाहीत तर कदाचित तो दिवस पूर्णच झाला नाही असे भासते. अलीकडे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स (Whatsapp Stickers) हा एक पर्याय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, शिवजयंतीच्या निमित्त सुद्धा तुम्ही शिवाजी महाराजांच्या रूपातील हे स्टिकर्स तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना पाठवून त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकाल. काळजी करू नका हे स्टिकर्स सोप्प्या मार्गाने कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Shiv Jayanti 2020 Messages: शिव जयंती च्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस

शिवजयंती विशेष व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स कसे डाउनलोड कराल?

-WhatsApp ओपन करा त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या चॅट विंडोमध्ये जा.

-खालच्या बाजूला तुम्हाला इमोटीकॉन्सच्या बाजूला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

-उजव्या कोपऱ्यात + साईनवर क्लिक करा.

-सर्वात खाली Get More Stickers चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हांला गुगल प्ले स्टोअरची लिंक ओपन झालेली दिसेल.

-त्यानंतर शिवजयंती किंवा शिवाजी महाराज स्टिकर्स असं टाईप करा. तुम्हाला अनेक स्टिकर्सचे सेट्स दिसतील.

-तुम्हांला आवडेल ते स्टिकर्स पॅक निवडा आणि Add To whatsapp वर क्लिक करा. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मध्ये शिवजयंतीचे स्टिकर्स आले असतील.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया , शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरी वर जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार आहेत.