Chhatrapati Shivaji Maharaj (Photo Credits: WikiCommons)

Shivaji Maharaj Jayanti 2020 Songs: 'झाले बहु होतील बहु परंतू या सम हा' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले जाईल ते मराठ्यांची शान, मराठ्यांचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरा करणे म्हणजे प्रत्येक मराठ्यांसाठी जणू दिवाळीच. ज्यांच्या पराक्रमाची गाथा शब्दांत मांडता येणे शक्य नाही अशा छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर मोठा शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी देखील शिवजयंती साजरी केली आहे. ज्यांच्या शौर्याची गाथा सांगताना प्रत्येक मराठ्याची छाती अभिमानाने भरून येईल त्या शिवरायांची जन्मोत्सव साजरा करणे म्हणजे प्रत्येक मराठ्यांचे भाग्यच म्हणावे लागेल.

जिजाऊ पोटी जन्मलेल्या या शूरवीराला जयंती दिनी अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाळण्यात ठेवून पाळणागीत गायले जाते. अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची आठवण करुन देणारी ही सुंदर पाळणागीते नक्की ऐका:

हेदेखील वाचा- Shiv Jayanti 2020 Date: शिवजयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?

शिवजयंती निमित्त महाराष्ट्रासह देशा-परदेशातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवजयंतीचा उत्सव कधीही साजरा होत असला तरीही महत्त्वाचे आहे ते म्हणजे महाराजांचे गुण, कर्तृत्व आणि विचार. ते आपण अंगिकारण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करुया.