Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

Marathi Bhasha Din 2023 Messages: महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला.

27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठी भाषेचे संवर्धन करणं हा यामागचा उद्देश आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी बांधव एकमेकांना खास शुभेच्छा देतात. सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रॅम या माध्यमातून तुम्ही खास मराठी राजभाषा दिनाचे शुभेच्छा संदेश शेअर करु शकता. (हेही वाचा - Marathi Official Language Day 2023 : मराठी राजभाषा दिन; महत्त्व, स्वरुप आणि विस्तार, घ्या जाणून)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,

मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,

आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या

सर्व मराठी बांधवाना…

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,

मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार,

वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते.

भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान

हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान

महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत

आमची माय मराठी

अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते

आमची माय मराठी

संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे

आमची माय मराठी

नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही

आमची माय मराठी

मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Marathi Bhasha Din 2023 Messages (PC - File Image)

संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात.