Marathi Official Language Day 2023 : मराठी राजभाषा दिन; महत्त्व, स्वरुप आणि विस्तार, घ्या जाणून
Marathi Bhasha Din 2020 (Photo Credits-File Image)

मराठी भाषा (Marathi Language) ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी ही महाराष्ट्राची भाषा बनली असली तरी मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात बोलली जाते. मराठी ही गोवा राज्याची सह-अधिकृत भाषा आहे. सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेतला तर भारतात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 9 कोटी इतकी आहे. सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही लोकसंख्येनुसार भारतातील तिसऱ्या आणि जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. जी भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषेच्या गौरवासाठी राज्य आणि सामाजिक स्तरावरही मोठे प्रयत्न केले जातात. त्याचा एक भाग म्हणून 'मराठी राजभाषा दिन' (Marathi Official Language Day 2023) साजरा केला जातो. जो प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा होतो.

मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवरी याच दिशी का?

मराठी राजभाषा दिन मराठीतील थोर कवी, लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. शिरवाडकर यांची जयंती 27 फेब्रुवारी या दिवशी असते. त्यामुळे मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा होतो. (हेही वाचा, International Mother Language Day Images: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करा मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन)

मराठी भाषा दिन महत्त्व आणि स्वरुप

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा एक असा दिवस आहे. ज्या दिवशी मराठी लोक मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविधता दर्शवणारे कार्यक्रम साजरे करतात. हा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलने आणि मराठी भाषेचे सौंदर्य आणि अभिजातता दर्शविणारी चर्चासत्रांनी साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने जीवनात भाषेचे महत्त्व प्रतिबिंबित केले जाते. भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेप्रती अधिक व्यापक भूमिका व्यक्त केली जाते.