World Health Day 2023 Theme, Quotes: जागतिक आरोग्य संघटना (WHO) दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करते. डब्ल्यूएचओच्या मते, आरोग्य म्हणजे केवळ निरोगी खाणे नव्हे, तर प्रत्येकाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी जग कसे एकत्र येईल याची खात्री करणे. वैद्यकीय क्षेत्रात नवीन शोध, नवीन औषधे आणि नवीन लसींसोबतच, आरोग्यविषयक समस्यांबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवणे हे देखील जागतिक आरोग्य संघटनेचे प्राधान्य आहे.
WHO च्या स्थापनेचा दिवस म्हणून जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात झाली. 1948 मध्ये, जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन WHO ची स्थापना केली. दोन वर्षांनंतर, 1950 मध्ये, पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिनानिमित्त Wishes, Images, Messages, Whatsapp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा द्या. (हेही वाचा - जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा देत साजरा करा वर्ल्ड हेल्थ डे!)
आनंदी रहा
निरोगी रहा
आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!
निरोगी आरोग्या विना वैभव असे व्यर्थ
पोषक आहार, शांत झोप अन व्यायामाने करू जीवन सार्थ
दरवर्षी जागतिक आरोग्य दिन एका अनोख्या थीमसह साजरा केला जातो. डब्ल्यूएचओने यंदा ‘हेल्थ फॉर ऑल’ या थीमसह तो साजरा करण्याचे ठरवले आहे. आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि आर्थिक अडचणींची पर्वा न करता प्रत्येकाला आवश्यक तेव्हा आणि कुठे आरोग्य सेवा मिळायला हवीत हा विचार या वर्षीची थीम प्रतिबिंबित करते.