Raksha Bandhan 2023 Messages: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीतील प्रेम आणि सौहार्दाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. शुभ मुहूर्त भावाच्या मनगटावर राखी बांधल्याने भावाला यश आणि विजय प्राप्त होतो. हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी सावन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सोबतच भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. धार्मिक ग्रंथानुसार रक्षाबंधन हा सण भाद्र काळात साजरा करू नये. भाद्र काळात राखी बांधणे शुभ नाही अशी धार्मिक मान्यता आहे. रक्षाबंधननिमित्त WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes शेअर करून तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला द्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या; वाचा 'या' सणाचे विशेष महत्त्व आणि इतिहास)
ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा...
कायम तूच केलीस माझी रक्षा...
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश!
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा !
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
पौराणिक कथेनुसार, भाद्र काळात त्याच्या बहिणीने लंकापती रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रामाने रावणाचा वध केला होता. या कारणास्तव, भाद्र काळात कधीही राखी बांधली जात नाही.