
Guru Ravidass Jayanti 2023 Messages: संत रविदास जयंती हा उत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी 2023 मध्ये रविदास जयंती 5 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. यावर्षी संत रविदासजींची 646 वी जयंती साजरी केली जाणार आहे. रविदास जयंतीच्या दिवशी रविदासजींचे अनुयायी मिळून विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात. रविदास जयंती 2023 निमित्त अनेक ठिकाणी मिरवणूकाही काढण्यात येताता. रविदास यांचा जन्म 1398 मध्ये एका रविवारी झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले.
संत रविदासजींनी कृष्णाची प्रेयसी असलेल्या मीराबाई यांना भक्तीसाठी प्रेरित केले होते. मीराबाई या संत रविदासजींच्या शिष्या होत्या. संत रविदासजींनी आपले आयुष्य भगवंताच्या भक्तीत व्यतीत केले होते. लहानपणापासूनच ते भगवंताच्या भक्तीत मग्न होते. संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्ताने Wallpaper, WhatsApp Status, HD Images शेअर करत सोशल मीडियाद्वारे खास शुभेच्छा द्या.
मन चंगा तो कठौती में गंगा
संत श्री रविदास जी यांना कोटी कोटी प्रणाम.
गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा!

संत रविदास महाराज जयंतीच्या
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

कोणतीही व्यक्ती जन्मामुळे मोठी किंवा लहान नसते,
माणसाची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते.
संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

वंश, धर्म, जात, रंग भेद न करता
या जगाला एक सुंदर ठिकाण बनवूया.
गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा.

जर तुमचे हृदय शुद्ध असेल तर
तुमच्या बादलीतील पाणी पवित्र पाणी आहे.
पवित्र स्नान करण्यासाठी
तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा.

संत रविदासजींचा जन्म एका चांभार कुटुंबात झाला. संत रविदासजींचा जातीवर कधीच विश्वास नव्हता. समाजाला जातीभेदातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संत रविदासजींच्या शिकवणीचा आजही लोकांवर प्रभाव पडतो. रविदासजी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत करत असतं.