
Putrada Ekadashi 2024 Messages: हिंदू धर्मात, एकादशी तिथी भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानली जाते. वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचे (Putrada Ekadashi 2024) व्रत केले जाते. पहिला उपवास पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला, तर दुसरा उपवास सावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला केला जातो. हे व्रत पाळल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 07:26 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, 21 जानेवारी रोजी 07:26 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार पौष पुत्रदा एकादशी रविवार, 21 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. 21 जानेवारी ला पौष पुत्रदा एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे.
पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुराण आणि महाभारतात सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितले होते की पौष महिन्यात पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास संततीचे सुख मिळते. याशिवाय हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनही सुखी राहते. भगवान विष्णूच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशी निमित्त Images, Greetings, Quotes शेअर द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास खास शुभेच्छापत्र शेअर करू शकता.
विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम अशी राहो…
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठल माझा ध्यास,
विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास,
विठ्ठल माझा आभास
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय श्री लक्ष्मी नारायण नमः
पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर
भगवान विष्णू तुमच्या मुलांना
सुख, शांती, समृद्धी देवो.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

ओम लक्ष्मी नारायण नमो नम:
तुम्हाला संतती आणि संपत्तीचे सुख मिळो.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्यास
भगवान श्री हरींची कृपा राहते व
सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली,
तुझ्या चरणी ठेवतो माथा
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने साधकासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात, असेही मानले जाते. भगवान विष्णूला समर्पित एकादशीचे व्रत केल्याने पापापासून मुक्ती मिळते.