National Youth Day 2024 Messages: राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2024) दरवर्षी १२ जानेवारीला देशभरात साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा जन्म झाला होता. स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असलेल्या नरेंद्रनाथांनी वयाच्या 25 व्या वर्षी संन्यास घेतला. निवृत्तीनंतर ते विवेकानंद या नावाने जगभर प्रसिद्ध झाले.
स्वामी विवेकानंद वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी स्वामीजींच्या जयंतीदिनी युवा दिन साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांनी देशातील तरुणांना ज्ञानाच्या धडे गिरवले. आजही त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तुम्ही खालील Images, Greetings, Quotes शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज मोफत डाऊनलोड करता येतील. (हेही वाचा - Swami Vivekananda’s Quotes: स्वामी विवेकानंद यांचे तरूणाईला प्रेरणा देणारे विचार सोशल मीडीयात शेअर करत साजरा करा National Youth Day 2022)
उठा! जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.
तुमचे तारुण्याचे दिवस सर्वोत्तम बनवा
कारण ते कधीच परत येणार नाहीत…
या वेळेचा आनंद घ्या पण जबाबदार आणि मेहनती व्हा.
राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
देशाचे भवितव्य देशाच्या तरुणांवर अवलंबून असते... देशातील सर्व तरुणांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भविष्य उज्ज्वल आहे
याची खात्री करण्यासाठी कोणत्याही देशाने
तरुणांना योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,
सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या
आणि समजून घ्या की, तुम्ही तुमच्या
नशिबाचे निर्माते आहात.
राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्या विचार आणि आदर्शांसाठी प्रसिद्ध असलेले स्वामी विवेकानंद हे धर्म, तत्वज्ञान, इतिहास, कला, सामाजिक विज्ञान आणि साहित्याचे जाणकार होते. इतकेच नाही तर भारतीय संगीताची जाण असण्यासोबतच ते चांगले वादकही होते. या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.