![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_1-380x214.jpg)
Lala Lajpat Rai Jayanti 2023 Quotes: लाला लजपत राय जयंती यांची जयंती दरवर्षी 28 जानेवारी रोजी देशभरात साजरी केली जाते. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला. त्यांना पंजाब केसरी म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. लाल-बाल-पाल या तीन महान नेत्यांपैकी लाला लजपत राय हे एक होते. लाला लजपत राय हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. 1928 मध्ये त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनात भाग घेतला.
या दरम्यान इंग्रजांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्यांनी म्हटले होते: "माझ्या अंगावर पडलेली प्रत्येक लाठी ब्रिटिश सरकारच्या शवपेटीतील खिळ्याप्रमाणे काम करेल." या घटनेनंतर काही दिवसांनी 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. लाला लजपत राय यांचे प्रेरणादायी विचार आजही तरुणांना नवी प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त Messages, WhatsApp Status, Wallpapers, Images शेअर करून तुम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता.
अवलंबित्वाकडे वाटचाल करणे म्हणजे दुर्बलतेकडे जाणे.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_1.jpg)
तुमच्या तीव्र भावनांच्या जोरावर तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकता.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_2.jpg)
लहान मुलांसाठी दूध, प्रौढांसाठी अन्न आणि
सर्वांसाठी शिक्षण आवश्यक आहे.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_3.jpg)
पराजय आणि अपयश ही कधी कधी
विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक पावले असतात.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_4.jpg)
अहिंसा म्हणजे पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने
शांततापूर्ण मार्गाने उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_4.jpg5_.jpg)
वेळ हा खूप मौल्यवान आहे, त्याची किंमत ओळखून आपण ताबडतोब काही कठोर निर्णय घेतले पाहिजेत, जेणेकरून आपल्या भावी पिढ्या सुरक्षित राहतील.
- लाला लजपत राय
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Lala-Lajpatrai-Jayanti-2023-Quotes_6.jpg)
लालाजींच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांनी लालाजींवर केलेल्या खुनी लाठीचार्जचा बदला घेण्याचे ठरवले. आणि 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटीश पोलीस अधिकारी सॉंडर्स यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना केवळ लालाजींच्या मृत्यूच्या बदल्यात साँडर्सच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झाली.