Happy Christmas Wishes in Marathi: जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे. देशभरात ख्रिसमस (Christmas) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 डिसेंबरला मेरी ख्रिसमस धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. प्रभु येशूच्या वाढदिवसानिमित्त सांताक्लॉज देखील लोकांमध्ये आनंदाचे वाटप करतात आणि मुलांना भेटवस्तू देतात.
दरवर्षी मुले सांताक्लॉज आणि भेटवस्तूंची प्रतीक्षा करतात. सांताक्लॉजशिवाय ख्रिसमस अपूर्ण वाटतो. ख्रिसमसनिमित्त तुम्ही खास Wallpapers, Messages, WhatsApp Status, HD Images शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना नाताळच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Christmas Recipes: ख्रिसमस स्पेशल रेसिपी बनवा झटपट घरच्या घरी, Watch Recipe Video)
येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात ख्रिसमस साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हटले जाते. ख्रिस्तापासून ख्रिसमस तयार झाला आहे. बायबलमध्ये (ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ) येशू ख्रिस्ताच्या जन्म तारखेचा उल्लेख नाही. परंतु त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.