Happy Shani Jayanti 2022 Messages: शास्त्रानुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला झाला होता. यंदा शनि जयंती 30 मे रोजी आहे. ज्योतिषशास्त्रात शनि जयंतीचे विशेष महत्त्व आहे. यंदा शनि जयंतीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. शनिदोषाने पीडित लोकांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांचे दुप्पट फळ मिळते, असे म्हणतात.
हिंदू कॅलेंडरनुसार, शनि जयंती हा सण ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा जन्म ज्येष्ठ अमावस्या तिथीला झाला होता. भगवान सूर्य हे त्यांचे वडील आणि आई छाया आहेत. शनि जयंतीनिमित्त पूजा, स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. शनि जयंतीनिमित्त Images, Wishes, Whatsapp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खालील मेसेजेस नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Vat Purnima 2022 Date: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व)
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
हे शनि तुम हो सबसे बेमिसाल,
तुमसे आंख मिलाए किसकी है मजाल,
सूर्य के हो पुत्र तुम और छाया के लाल,
मूरत तेरी देखकर भाग जाए काल.
शनैश्चर जयंतीच्या शुभेच्छा!
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी |
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
ज्या लोकांच्या आयुष्यात संकट आणि शनिदोष आहेत, त्यांनी शनि जयंतीनिमित्त शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. शनिदेव हे कर्मफल देणारे दंडाधिकारी आणि न्यायी मानले जातात. असे मानले जाते की, शनीची शुभ दृष्टी कोणावरही पडल्यास त्याच्या जीवनात सुख, सुविधा, ऐश्वर्य यांची कमतरता येत नाही. शनि जयंतीला शनिदेवाची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते. शनिदोषापासून मुक्ती आणि शनीची शांती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.