Laylatul Qadr 2020 Wishes & Images: रमजानचा (Ramadan) पवित्र महिना पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज भारतात 26 वा रोजा असून या रात्रीही शब-ए-कद्र (Shab-e-Qadr) साजरा केला जातो. ही रात्र रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांच्या (21, 23, 25, 27 वा किंवा 29वा) विषम क्रमांक असलेल्या रात्रीपैकी एक असते. परंतु, पारंपारिकरित्या रमजानची 27 तारीख रात्री शब-ए-कद्र म्हणून साजरी केली जाते. लैलात अल-कद्र (Laylat al-Qadr) या नावाने देखील ओळखली जाणारी ही रात्र इस्लाममध्ये सर्वात पवित्र रात्रींपैकी एक मानले जाते. रात्री मुसलमान पहाटेपर्यंत खास प्रार्थना आणि दुआ करतात. या रात्री प्रार्थना करणे हा एक मोठा सन्मान आहे. मुस्लिम समाजात ही रात्रीचे खूप महत्व असते. इस्लामिक श्रद्धेनुसार लैलातुल कद्रच्या रात्री पहिल्यांदा पैगंबर मोहम्मदला कुराणचे पहिले छंद माहित पडले होते. रात्रभर इबादत केली जाते आणि अल्लाहचे मन वळवले जाते. या दिवशी, उपदेशक आणि धार्मिक विद्वान इस्लामची शिकवण आणि पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतात आणि मुस्लिमांनी त्यांचे पालन करण्याचे आवाहन करतात. (Shab-e-Qadr 2020: भारतात कधी आहे शब-ए-कद्र ! जाणून घ्या या रात्री इबादत करण्याचे महत्त्व)
मुस्लिम समुदायाचे लोक Whatsapp वर या रात्रीच्या शुभेच्छा संदेश आणि फोटो पाठवतात. आपण देखील या फोटोंद्वारे सोशल मीडियावर आपल्या मुस्लिम मित्र, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकतात.
1. शब-ए-कद्र मुबारक
2. लैलातुल कद्र मुबारक
3. 27वी शब मुबारक
4. लैलातुल कद्र मुबारक
पाक महिना रमजान आता संपणार आहे. आज भारतात 26 वा दिवस आहे आणि ईदचा उत्सव सोमवारी साजरा केला जाईल. तसे, हे चंद्रावर देखील अवलंबून असते. शनिवारी चंद्र दिसत असल्यास, रविवारीही ईद साजरी केली जाऊ शकते.