Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 6 (Photo Credit - File Image)

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi: नवरात्री (Navratri 2024)  हा देवी दुर्गाला समर्पित असा सण आहे. हिंदू धर्मात नऊ दिवसांच्या या सणाला खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2024) अश्विन महिन्यात साजरी केली जाते, जी शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरू होते आणि नवमीपर्यंत चालते. या नऊ दिवसांमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. यावर्षी, शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार, 3 ऑक्टोबर, 2024 रोजी होईल. तसेच शनिवारी 12 ऑक्टोबर, 2024 रोजी शारदीय नवरात्रीची समाप्ती होईल.

पुराणानुसार, शारदीय नवरात्रीत देवी दुर्गा आपल्या कुटुंबासह आणि अनुयायांसह पृथ्वीवर अवतरते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची प्रथा आहे. यंदा 3 ऑक्टोबर 2024 रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. घटस्थापनेचा दिवस अधिक खास करण्यासाठी तुमच्या मित्र परिवाराला घटस्थापनेच्या शुभेच्छा, घटस्थापना कोट्स, घटस्थापना संदेश, घटस्थापना मराठी शुभेच्छा, घटस्थापना मेसेज, घटस्थापना ग्रेंटिंग्ज नक्की शेअर करा. (हेही वाचा - Shardiya Navratri 2024 Ghatasthapana Muhurat: घटस्थापना कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)

आई जगदंबेची तुमच्यावर अखंड कृपा राहो,

तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखी होवो,

देवी जगदंबेच्या चरणी हीच आमची प्रार्थना,

घटस्थापनेच्या तुम्हाला आणि कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 1 (Photo Credit - File Image)

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना

सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी

आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 2 (Photo Credit - File Image)

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि

सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य

भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 3 (Photo Credit - File Image)

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर

सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन

आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना

घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 4 (Photo Credit - File Image)

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता,

शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana 2024 Wishes In Marathi 5 (Photo Credit - File Image)

देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात लहानांपासून मोठ्यापर्यंत दांडीया नृत्य करण्याची प्रथा आहे. विवाहित महिला नवरात्र उत्सवात नऊ दिवस व्रत पाळतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी दुर्गा मातेकडे प्रार्थना करतात.