Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

Sant Gadge Maharaj Quotes in Marathi : संत गाडगे बाबा हे खरे निस्वार्थी कर्मयोगी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोठा, शाळा, रुग्णालये, वसतिगृहे बांधली. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता, जनजागरण आणि सामाजिक क्रांतीचे वाहक संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी त्रयोदशी कृष्ण पक्ष महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला. गाडगे बाबांचे बालपणीचे नाव डेबूजी होते. संत गाडगे यांचे देवासारखे सुंदर व सुडौल शरीर, गोरा वर्ण, उन्नत कपाळ आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे त्यांना पाहून लोक त्यांना डेबूजी म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगारजी, आईचे नाव सखुबाई आणि आडनाव जानोरकर होते.

दया, करुणा, बंधुता, सौहार्द, मानव कल्याण, परोपकार, गरिबांना मदत या सद्गुणांचा साठा असलेले बुद्धाचे आधुनिक अवतार डेबूजी सन १९०५ ते १९१७ पर्यंत साधकाच्या अवस्थेत राहिले. डेबूजी नेहमी आपल्याजवळ एक मातीचे भांडे ठेवत. यामध्ये ते अन्न खात आणि पाणीही पीत. महाराष्ट्रात मातीच्या भांड्याला गाडगे म्हणतात. त्यामुळे काही लोक त्यांना गाडगे महाराज म्हणू लागले तर काही लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले आणि पुढे ते संत गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे Quotes शेअर करत पुढील पिढीपर्यंत महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी तुम्हाला खालील मेसेज नक्की उपयोगात येतील. तुम्ही या ईमेज फ्री डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gadge Maharaj Punyatithi 2022: संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही आश्चर्यकारक तथ्ये, जाणून घ्या)

माणसाचे खरोखर देव

कोण असतील तर ते

आई-बाप.

- संत गाडगे बाबा

Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

जो वेळेवर जय मिळवतो

तो जगावरही जय मिळवतो.

- संत गाडगे महाराज

Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

दगड धोंड्यांची पूजा करण्यात

वेळ आणि शक्ती

वाया घालवू नका

- संत गाडगे महाराज

Sant Gadge Maharaj Quotes (File Image)

दान घेण्यासाठी हात पसरू नका,

दान देण्यासाठी हात पसरा.

- संत गाडगे बाबा

Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि

शेतकरी सुखी, तर जग सुखी.

म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा

आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा.

हाच आजचा धर्म आहे.

- संत गाडगे बाबा

Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय

सुखाचे किरण दिसत नाहीत.

- संत गाडगे महाराज

Sant Gadge Maharaj Quotes (PC - File Image)

गाडगे बाबा हे डॉ. आंबेडकरांचे समकालीन होते आणि त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. गाडगे बाबा अनेक राजकारण्यांना भेटत असतं. पण डॉ.आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.