Sankashti Chaturthi May 2019: 22 मेच्या संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयाची वेळ काय?
Sankashti Chaturthi (Photo Credits : commons.wikimedia)

कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणारी ही चतुर्थी गणेशभक्तांसाठी खास असते. मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi) यंदा बुधवार, 22 मे दिवशी आहे. गणेशभक्त या दिवशी गणपतीची पूजा करतात. तर काही जण महिन्यातून एकदा येणार्‍या या संकष्टी दिवशी उपवास करतात. गणपती आणि चंद्रदर्शनाचं एक वेगळं नातं आहे. संकष्टी चतुर्थीचे अनेक उपासकरी चंद्रोदय (Moon Rise) झाल्यानंतर उपवास सोडतात. मग पहा यंदाच्या संकष्टीच्या चंद्रोदयाची वेळ काय?

मे 2019 संकष्टी चंद्रोदय वेळ

दाते पंचांगानुसार, 22 मे 2019 दिवशी चंद्रोदय रात्री 23:23 होणार आहे. त्यामुळे उपवास करणार असाल तर संकष्टीचा उपवास तुम्हांला रात्री रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी सोडता येणार आहे.

कशी कराल पूजा?

संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा करताना दुर्वा आणि जास्वंदीची फूल गणपतीला वाहिली जातात. तर नैवेद्यामध्ये उकडीचे मोदक केले जातात.  उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

गणपती हा विघ्नहर्ता असल्याने संकटांचे हरण करणार्‍या गणेशाची संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा केली जाते