Lord Ganesha (Photo credits: File image)

हिंदू धर्मीयांसाठी प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी महत्त्वाची असते. गणेशभक्तांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) साजरी केली जाते. फेब्रुवारी 2022 महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज 20 फेब्रुवारी दिवशी आहे. आजच्या दिवशी गणरायाची पूजा करण्याची त्याच्यासाठी उपवास करण्याची रीत आहे. हा उपवास काही गणेशभक्त संध्याकाळी चंद्रोदयानंतर सोडतात. त्यामुळे संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ ही अनेकांसाठी महत्त्वाची असते. नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2022 Messages: संकष्टी चतुर्थी निमित्त Images, Greetings, Wishes द्वारे गणेशभक्तांना शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस! 

महाराष्ट्रातही प्रमुख गणेश मंदिरांमध्ये संकष्टीला चंद्रोदयाच्या वेळी आरती केली जाते. पण स्थळानुसार ही चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील, राज्यातील आजची चंद्रोदयाची वेळ काय?

आजची संकष्टी चतुर्थीची चंद्रोदय वेळ

मुंबई- 22:01

पुणे - 21:57

रत्नागिरी - 21:59

गोवा- 21:56

नागपूर - 21:36

बेळगाव- 21:53

नाशिक- 21:58

दरम्यान संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधत आज बाप्पाच्या नैवेद्यामध्ये साग्रसंगीत रूचकर पदार्थ केले जातात. त्यामध्ये उकडीचा मोदक हा हमखास असतो. संकष्टीला गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला जास्वंदाचं फूल, दूर्वा अर्पण केल्या जातात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी संकष्टीचं व्रत केले जाते.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. लेटेस्टली मराठी त्याची पुष्टी करत नाही. धार्मिक भावना दुखावण्याचा, अंंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.