
Sankashti Chaturthi 2022 Messages: येत्या 21 जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे. हा दिवस गणपतीच्या पूजेला समर्पित आहे. आद्य उपासक म्हटला जाणारा गणपती कुटुंबाला सुख-समृद्धी प्रदान करण्यासोबतचं संकटे दूर करतो. सणानिमित्त बाजारपेठांमध्ये तिळाच्या लाडूंसोबतच पूजेत वापरल्या जाणार्या इतर वस्तूंची दुकाने सजली आहेत. ज्येष्ठ ज्योतिषी डॉ. गोपाल दत्त त्रिपाठी यांनी सांगितले की, या दिवशी श्री गणेशाने देवतांचे संकट दूर केले होते. भगवान शंकरानेही त्यांना दुःखाची देवता म्हटले होते. या दिवशी कुटुंब आणि मुलांचा त्रास दूर करण्यासाठी विवाहित स्त्रिया कडक उपवास करतात. चंद्राची पूजा करण्याचा हा सण चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरा केला जातो.
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजस नक्की उपयोगात येतील. या ईमेज वापरून तुम्ही आपल्या मित्र- मैत्रिणींना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Lambodara Sankashti Ganesh Chaturthi 2022: संकष्टी गणेश चतुर्थी व्रताचे महत्व, जाणून घ्या)
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

जानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगलमूर्ती, वरदविनायक,
तूच विघ्नहर्ता आणि तूच पालनकर्ता
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

या दिवशी निर्जला व्रत करणाऱ्या स्त्रिया चंद्रोदयाच्या वेळी रात्री गणेशाची पूजा करतात. पूजेदरम्यान तिळाचे लाडू अर्पण केले जातात. पूजेनंतर चंद्राचे दर्शन घेऊन या वर्ताची सांगता केली जाते.