Sankashhti Chturthi June 2025 Chandrodaya Timings: मुंबई, पुणे ते गोवा पर्यंत आज संकष्टी चतुर्थी व्रताच्या सांगता साठी चंद्रोदयाची वेळ काय?

गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणेश हा देवांचा देव आहे. माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी "सकट चौथ" म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये उकडीचे मोदक करून बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

Sankashhti Chturthi June 2025 Chandrodaya Timings:  मुंबई, पुणे ते गोवा पर्यंत आज संकष्टी चतुर्थी व्रताच्या सांगता साठी चंद्रोदयाची वेळ काय?
Ganpati | Wikipedia

गणेशभक्तांमध्ये संकष्टी चतुर्थीचं (Sankashhti Chturthi) विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थी असते. त्यामुळे काही गणेशभक्त नित्य नियमाने या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना करतात. त्याची कृपा दृष्टी कायम राहो यासाठी प्रार्थना करतात. दरम्यान संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रताची सांगता चंद्रोदयानंतर करण्याची प्रथा आहे. आकाशात रात्री चंद्रोदय झाला की बाप्पाची पूजा करून, आरती करून त्याला नैवेद्य दाखवून दिवसभराचा उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर राहणारे अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने उपवास करतात मग आज नेमका चंद्रोदयानंतर उपवास सोडण्याची वेळ काय आहे? हे घ्या जाणून

संकष्टी चतुर्थीला उपवास सोडण्याची चंद्रोदयानुसार वेळ काय?

मुंबई - 22.02

पुणे- 21.57

नाशिक - 22.00

नागपूर- 21.41

बेळगाव- 21.49

गोवा - 21.51

सोलापूर- 21.47

रत्नागिरी - 21.57

गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणेश हा देवांचा देव आहे. माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी "सकट चौथ" म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये उकडीचे मोदक करून बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. नक्की वाचा:  संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा Facebook Messages, Images द्वारा शेअर करत खास करा आजचा दिवस!

मान्यतांनुसार, संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार्‍या स्त्री किंवा पुरुषाने नव्याने व्रत सुरू करणार असल्यास ते श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावे असं सांगितलं जातं. सलग 21 संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. कांहीजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेकजण नियमित संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी च्या व्रताच्या सांगतेवेळेस "संकष्ट चतुर्थी माहात्म्य" वाचण्याचा सल्ला दिला जातो.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2025 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).