पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (Sane Guruji) यांची आज 120 वी जयंती आहे, 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी जन्मलेले साने गुरुजी हे मानवतावादी समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते. शेकडो कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. याच साहित्यातून आणि आपल्या जीवनशैलीतून त्यांनी पुढील पिढीला अनेक महत्वपूर्ण संदेश दिले त्यांचे हे विचार मानवतेचे पूरस्कर्ते आहेत यात काहीही शंका नाही. साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देतील त्यांनीच लिहिलेल्या या निवडक कविता
साने गुरुजी यांचे 10 अनमोल विचार
1 .आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.
2.आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
3.आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
4.एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.
5.करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.
6.कला म्हणजे परमोच्च ऐक्य.
7.कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
8.कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.
9.जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
10.जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.
साने गुरुजी यांचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. त्यामुळे, जर का तुम्ही पहिले असेल तर यामध्ये साने गुरुजी यांनी आईवरील प्रेम व्यक्त करणारे काही संदेश आवर्जून दिले आहेत. साने गुरुजी यांचे 11 जून 1950 रोजी निधन झाले. महात्मा गांधी यांच्या हत्येबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या अनेक मुद्द्यांमुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जाते.