
दुस-याला हसणे फार सोपे आहे पण दुस-याकरिता रडणे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंत:करण लागते. अशी मोलाची शिकवण देणा-या पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (Sane Guruji) यांची आज पुण्यतिथी. साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी झाला. साने गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. त्यांचे प्रसिद्ध आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'श्यामची आई' या चित्रपटात त्यांनी आपल्या आईविषयी ब-याच आठवणींना उजाळा दिला आहे. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यातीलच लोकांच्या कायम स्मरणात असलेली काही निवडक कविता...
खरा तो एकचि धर्म:
बलसागर भारत होवो:
हीच अमुची प्रार्थना:
आता उठवू सारे रान:
साने गुरुजी यांचे 11 जून 1950 रोजी निधन झाले. महात्मा गांधी यांच्या हत्येबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या अनेक मुद्द्यांमुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जाते. अशा या उत्तम लेखक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.