Sambhaji Maharaj Punya Tithi 2022 (Photo Credits: File Photo)

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages: संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांचे संगोपन त्यांची आजी जिजाबाई यांनी केले. कारण ते 2 वर्षांचा असताना त्याची आई सईबाई यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांना छावा असेही म्हणतात. मराठीत छावा म्हणजे सिंहाचे बाळ. संभाजी महाराजांना संस्कृत आणि इतर 13 भाषांचे ज्ञान होते. वयाच्या 9 व्या वर्षी संभाजी राजे यांना अंबरचे राजा जयसिंग यांच्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. घोडेस्वारी, धनुर्विद्या, तलवारबाजी हे त्यांना सर्वश्रुत होते आणि संभाजींनी अनेक शास्त्रेही लिहिली होती.

संभाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषणम, नायिकाभेद, सत्शतक आणि नखशिखांत या संस्कृत ग्रंथांची रचना केली. संभाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिले युद्ध केले आणि ते युद्ध जिंकले. या युद्धात ते 7 किलो वजनाच्या तलवारीने लढले. शंभूराजेंच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Messages , Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. (हेही वाचा - Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Images: छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त Greetings, Wishes, Messages शेअर करून करा शंभूराजांच्या स्मृतीस अभिवादन!)

शिवाजी महाराज यांचे वीरपुत्र

संभाजी महाराज यांना शत् शत् नमन

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2022 (Photo Credits: File Photo)

जिथे संभाजीभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!! अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages (PC - File Image)

कोंढाण्यासाठी तानाजी गेला

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला..

महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी झाला...

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages (PC - File Image)

एक छोटे पाऊल लहान ध्येयाकडे नेतो,

परंतु तेच छोटे लक्ष नंतर मोठे लक्ष्य प्राप्त करू शकते.

पुण्यतिथीनिमित्त संभाजी महाराज यांना शत् शत् नमन

Sambhaji Maharaj Punya Tithi 2022 (Photo Credits: File Photo)

शत्रू कमकुवत आहे याचा जास्त विचार करू नका,

आणि त्यांच्या सामर्थ्याला जास्त महत्व देऊ नका.

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2022 (Photo Credits: File Photo)

11 मार्च 1689 रोजी संभाजीचा शिरच्छेद करण्यात आला. मराठा साम्राज्य टिकवण्यात संभाजी महाराजांचा मोठा वाटा आहे.