Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Images: छत्रपती संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचा पाया रचणारे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांची मुघल सम्राट औरंगजेबने हत्या केली. लहान वयातच त्यांना राजकारणाची सखोल जाण होती. संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. हे ठिकाण पुण्यापासून ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या पहिल्या आणि प्रिय पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराज फक्त दोन वर्षांचे होते, तेव्हा त्यांची आई वारली. त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाईंनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून तुम्ही शंभूराजांना अभिवादन करू शकता.
शिवपुत्र, महासम्राट
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथि निमित्त त्रिवार वंदन!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
जय शंभूराजे.!!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
जय संभाजी राजे..!!
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन!
जय संभाजी, जय शंभुराजे..!!!
इस्लामचा स्वीकार करण्यास नकार दिल्यानंतर संभाजी राजे आणि कविकलाश यांची विदूषक वेशभूषा करून शहरभर परेड काढण्यात आली. वाटेत त्यांच्यावर दगडांचा पाऊस पडला. दोघांची जीभ कापण्यात आली आणि डोळे काढण्यात आले. 11 मार्च 1689 रोजी त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांचा जीव घेण्यात आला.