
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2020 Marathi Wishes: शिवरायांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा 14 मे दिवशी तारखेनुसार आज जन्मसोहळा आहे. शिवशंभु संभाजी महाराज यांची जयंती ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे 14 मे दिवशी साजरी केली जाते. संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली झाला. शिवरायां इतकेच दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवणार्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करत आज शिवशंभूंच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा कुटुंबियांसह, मित्र मंडळींसोबत जगभरात विखुरलेल्या प्रत्येक अभिमानी महाराष्ट्रवासियापर्यत पोहचवण्यासाठी खास संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (Sambhaji Maharaj Jayanti), मेसेजेस, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), व्हॉट्सअॅप स्टिकर्स व्हॉट्सअॅप (WhatsAPP) , फेसबूक स्टेटस (Facebook), मेसेंजरच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी ही शुभेच्छापत्र शेअर करून छत्रपती शंभुराजेंचा जन्मसोहळा नक्की साजरा करा. Sambhaji Maharaj Jayanti 2020 Messages: संभाजी महाराज जयंती निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
दरवर्षी शिवप्रेमी शंभूराजेंच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात पण यंदा कोरोना संकटाच्या सावटामुळे महाराष्ट्रभरात हा उत्सव छोट्या स्वरूपात साजरा केला जाणार आहे. मग या संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र देऊन आनंद द्विगुणित करा आणि हिंदवी राज्याच्या धाकल्या धन्याला त्रिवार अभिवादन करा.
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

शंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा!

धर्मवीर संभाजी महाराज
यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वीरयोद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे
यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन !

मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शुर,वीर जसे सुर्याचे तेज साजे,
असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे
शंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा!

उजळला सूर्याने पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा
काळजात जेव्हा अंधार दाटतो
शिव शंभुंच्या इतिहासाने
अवघा महाराष्ट्र पेटतो
छत्रपति संभाजी राजेंना जयंती निमित्त मानाचा मुजरा!

झुगारली सारी बंधने
तोडले सारे पाष
रणमर्द शंभुराजे
जन्मले पुरंदरास
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या
जन्मसोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हिडिओ पहा
पराक्रमी 'भोसले' घराण्यात शिवशंभूचा जन्म झाला तरीही आईचं छत्र लहानपणीच हरपलं होतं. त्यामुळे जिजाऊंनी नातवावर आईप्रमाणे माया केली. इतिहासात केलेल्या नोंदींच्या मते, संभाजीराजे अत्यंत देखणे, शूर होते. त्यांना अनेक भाषांत विद्याविशारद होती. अत्यंत धुरंदर राजकारणी होते. कमी वयातच त्यांनी राजकारणातील बारकावे आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवरायांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत नेले होते. शिवरायांचा हा दूरदृष्टी विचार खरंच वास्तवात आला. रणभूमीवर संभाजी महाराजांनी एकही युद्ध हरले नाहीत. त्यामुळे अशा या रयतेच्या राजाला जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा नक्की करा.