
Kargil Vijay Diwas 2024 HD Images: आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2024) साजरा करत आहे. 1999 मध्ये या दिवशी म्हणजेच 26 जुलै रोजी लडाखच्या कारगिल जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून भारतीय सैन्याने विजयाचा झेंडा फडकावला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे 2 महिने चाललेले युद्ध 14 जुलै रोजी यशस्वी घोषित करण्यात आले आणि 26 जुलै रोजी युद्ध पूर्णपणे संपुष्टात आले. तेव्हापासून, दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
याशिवाय, 16 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारताचा विजय हा विजय दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या युद्धानंतर, पाकिस्तानचे दोन भाग झाले आणि ज्याला पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) आणि पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) म्हटले जाते. कारगिल युद्धात अनेक जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला हे युद्ध जिंकून दिले. या शूर-वीरांना खालील तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages द्वारा अभिवादन करून विनम्र अभिवादन करू शकता.
कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम!

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा
त्यांच्या चरणी ठेवूया माथा
कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मातृ भूमीसाठी लढताना शहिद
झालेल्या वीर पुत्रांना
कारगिल विजय दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

कारगिल विजय दिनानिमित्त
सर्व शहिद जवानांना विनम्र अभिवादन!

कारगिल विजय दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

26 जुलैचा कारगिल विजय दिवस असो किंवा 16 डिसेंबरचा विजय दिवस असो, दोन्ही भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य आणि बलिदान प्रतिबिंबित करतात. या दोन्ही प्रसंगी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.