Republic Day 2022 Quotes in Marathi: भारतात दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 2022 मध्ये भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळेपर्यंत 26 जानेवारी रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला. (वाचा - Republic Day 2022 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी 'या' पद्धतीने करू शकतात भाषणाची तयारी; वाचा सविस्तर)
26 जानेवारी 1950 रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण करून भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले होते. तेव्हापासून भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (वाचा - Happy Republic Day 2022 Patriotic Quotes: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी WhatsApp स्टिकर्स, 'जय हिंद' HD प्रतिमा, टेलिग्राम संदेश, सिग्नल ग्रीटिंग्ज आणि Facebook GIF)
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपला
कधीही फिका न पडो रंग त्यातला
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी संविधान लागू झाले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.