
Republic Day 2022 Messages: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 1950 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. स्वतंत्र प्रजासत्ताक बनण्यासाठी आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह ते अंमलात आले.
भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण ऐकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता. (वाचा - Republic Day 2022 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी 'या' पद्धतीने करू शकतात भाषणाची तयारी; वाचा सविस्तर)
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला
प्रजासत्ताक दिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज;
सर्वात उंच फडकतो आहे….
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत
प्रजासत्ताक दिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या दिवशी प्रत्येक भारतीय आपल्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये इत्यादीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत अनेक आकर्षक आणि मनमोहक कार्यक्रमांचे आणि परेडचे आयोजन केले जाते.