Ratha Saptami 2024 Wishes: रथ सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी 16 फेब्रुवारी 2024 रोजी रथ सप्तमी साजरी होत आहे. रथ सप्तमीला माघ सप्तमी, माघ जयंती, सूर्य जयंती, आरोग्य सप्तमी आणि अचला सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते, असे मानले जाते. या शुभ तिथीला सूर्य देव प्रकट झाला होते. सूर्य देवाने भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते, म्हणून या दिवशी सूर्याची आराधना करून सूर्य चालिसाचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते, म्हणून लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. रथ सप्तमीच्या शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, फेसबुक ग्रीटिंग्ज, कोट्सद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.
रथ सप्तमीचे शुभेच्छा संदेश
असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेव प्रकट झाले होते, म्हणून हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. रथ सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर, सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करण्याची, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची आणि दिवा दान करण्याची परंपरा आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना पाण्यात लाल कुंकू, लाल फुले आणि गुळाचा वापर करावा. असे केल्याने भक्तांना सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या समस्या व मनोकामना पूर्ण होतात.