नवरात्रोत्सव 2018 :यंदा बॉलिवूडच्या या '4' नव्या गाण्यांवर नक्की रंगणार गरबा नाईट !
गरबा नाईट्स Photo credits: You Tube

नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासोबतच अनेकांना गरब्यामध्ये नाचण्याचा विशेष उत्साह असतो. प्रामुख्याने तरूणाईला गरबा नाईट्सचं विशेष आकर्षण असते. आजकाल नवरात्रीमध्ये सार्‍या महिला एकाच रंगाचे कपडे घालतात. गरबा नाईट्स हा आजच्या काळातला प्रकार आहे. पूर्वी देवीसमोर पारंपारिक स्वरूपात गरबा केला जात असे मात्र आता नवनव्या स्वरूपात गरबा खेळला जातो. यामध्ये दांडियापासून खास क्लबमध्ये गरबा नाईट्सचं आयोजन केलं जातं. मग तुम्हांलाही यंदा नव्या गाण्यावर गरब्यामध्ये थिरकायचं असेल तर ही बॉलिवूड गाणी नक्कीच ऑल टाईम हीट असतील.  नक्की वाचा :  नवरात्रोत्सव 2018 : मुंबईत या '5' ठिकाणी खरेदी करा ट्रेन्डी चनिया चोळी

चोगाडा तारा -

लवयात्री या सिनेमाच मूळात गरबा या आणि नवरात्री या थीमवर आधारित आहे. त्यामुळे यंदा गरब्यामध्ये लवयात्री सिनेमातील गाणी खूपच भाव खाऊन जाणार आहेत. लवयात्रीमधील 'चोगाडा तारा' हे गाणं मूळ पारंपारिक धूनवरच बांधण्यात आलं आहे.

कमरिया -

कमरिया हे मित्रो चित्रपटातील गाणंही यंदा नवरात्रीमध्ये खूप वाजेल यामध्ये काही शंका नाही.

रंगतारी -

लवयात्री चित्रपटातील 'रंगतारी' या गाण्याने युट्युबवर चित्रपट रीलिज होण्यापूर्वीच सारे रेकॉर्ड मोडले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या गाण्यालाही यंदा गरब्याला मोठी पसंती मिळणार आहे.

ढोलिडा

ढोलिडा हे गाणंदेखील नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगा घालणार आहे. नवरात्रोत्सव 2018 : यंदा 'या' नऊ रंगांमध्ये साजरा करा नवरात्रोत्सवाचा सण !