Happy Rang Panchami 2020 Marathi Messages: सणांची रेलचेल असलेल्या महाराष्ट्रात आता होळीचा सण काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रात विविध प्रातांत हा सण साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी अशा टप्प्यात हा सण साजरा केला जातो. होळी नंतर धुळवड आणि मग फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास 'रंगपंचमी' म्हणतात. यंदा रंगपंचमी 13 मार्च रोजी आहे. एकमेकांना रंग लावून आणि पाणी उडवून हा रंगाचा सण साजरा केला जातो. रंगाच्या या सणावर यंदा कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे रंगपंचमीचा सण साजरा न करण्याचे आवाहन नेते मंडळींकडून करण्यात येत आहे.
तुम्हाला सर्वच नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत हा सण साजरा करता येणे शक्य नसले तरी सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे संदेश शेअर करुन रंगपंचमीचा उत्साह वाढवू शकता. तसंच रंग खेळण्यास आवडत नसणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तरी देखील फेसबुक, व्हॉट्सअॅप द्वारे हे संदेश शेअर करुन हा रंगोत्सव तुम्ही सेलिब्रेट करु शकता. (जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा)
रंगपंचमीच्या शुभेच्छा:
रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे…
होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!
उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा
रंग यशाचा, रंग समृद्धीचा
होळीच्या रंगात रंगून
जावो तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
GIF's
पूर्वी अबीर आणि गुलाल वापरुन रंगपंचमी खेळली जात असे. कालांतराने विविध रंगाच्या माध्यमातून रंगपंचमीचा सण साजरा केला जावू लागला. आता बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. नैसर्गिक रंग सुरक्षित असल्याने तुमच्या सोबतच पर्यावरणाचेही नुकसान कमी होण्यास मदत होते.