दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि कोलकाता येथे रमजानचा चंद्र दिसल्याची हिलाल समित्यांनी घोषित केली. यासह देशभरातील सर्व मुस्लिम बांधव उद्यापासून रमजानच्या पाक महिन्याच्या उपवासाला सुरुवात करतील. केरळ आणि कर्नाटकमध्ये आजपासून रमजानची सुरुवात झाली. LatestLY कुटुंबाकडूम आमच्या सर्व वाचकांना शुभेच्छा! रमजान मुबारक
Ramzan 2020 Moon Sighting in India Live News Updates: रमजानचा चंद्र दिसला, 25 एप्रिलपासून संपूर्ण भारतात पवित्र रमजानला सुरुवात
Ramzan Moon Sighting 2020: मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या रमजानच्या सणाला भारतातील काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. गुरुवारी भारताच्या काही ठिकाणी रमजान महिन्याच्या सुरुवातीचा चांद दिसल्याने हा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. इस्लामिक कॅलेंडनुसार सुरु महिन्याच्या 29 व्या दिवशी चंद्र दिसला की पुढील नवव्या महिन्याची सुरुवात होते. मात्र जर चंद्रच दिसला नाही तर महिन्याचे 30 दिवस पूर्ण होतात. Moroccan खगोलशास्त्रज्ञ Abdelaziz Kharbouch Al Ifrani च्या माहितीनुसार यंदा रमजान महिना सौदी अरेबिया, युएई, कतार, कुवेतसह इतर आखाती देशांमध्ये 24 एप्रिलपासून सुरू होईल. मलेशियाने 23 एप्रिल दिवशी चंद्रकोर पाहिली जाईल असे सांगितलं आहे.
हलाल समुदायाकडून मुंबई, दिल्ली, लखनौ, अजमेर, भोपाळ, हैदराबाद आणि चैन्नईत रमजानचा चंद्र पाहण्यासाठी उलेमा आणि नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत.(Ramadan Iftar, Sehri Timetable 2020 For Mumbai: मुंबई शहरातील यंदा रमजान महिन्यातील सेहरी आणि इफ्तारच्या वेळांंचंं इथे पहा संपूर्ण वेळापत्रक!)
रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्याभराच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास पाळतात. या काळात त्यांना सकाळी सूर्योदयापूर्वी आणि रात्री सूर्यास्तानंतर अन्न पाणी घेण्याची मुभा असते. या महिन्याची सांगता रमजान ईद ने होते. त्यादिवशी सारे जण एकत्र येतात. गोडा-धोडाच्या पदार्थांसोबत एकमेकांना ईदी देतात. परंतु सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाचा रमजानच्या सण नागरिकांनी घरीच साजरा करावा असे आवाहन धर्मगुरुंनी केले आहे. त्याचसोबत नागरिकांनी रमजानच्या काळात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियामाचे पालन करावे असे ही सांगण्यात आले आहे.