रमजान मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

Ramzan Mubarak 2020 Marathi Messages: रमजान महिन्याचं मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व असतं. यंदा जगभरात 23 -24 एप्रिल ते 24 मे पर्यंत रमजान (Ramadan) महिना पाळला जाणार आहे. इस्लाम धर्मीय या महिन्याभराच्या काळात कडक उपवास म्हणजेच 'रोझा' पाळतात. पण यंदा या रमजान महिन्याच्या सेलिब्रेशनवर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने सार्‍यांनाच घरामध्ये राहूनच रमजान साजरा करायचा आहे. यंदा तुम्ही रमजान मासारंभाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना थेट भेटून देऊ शकत नसलात तरीही तुम्ही या सणाच्या निमित्ताने इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येऊन आनंद द्विगुणित करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक सारख्या सोशल मीडियावरील लोकप्रिय अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून रमजान मुबारक! म्हणत काही मराठमोळी, हिंदी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, वॉलपेपर्स, HD Images शेअर करून या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा नातेवाईक, मित्र मंडळींना देऊन नवीन महिन्याची सुरूवात करा. Ramzan Mubarak 2020 Wishes & Greetings: रमजान उल करीम उत्सवाला लवकरच होणार सुरुवात; WhatsApp Status, HD Images आणि Stickers च्या माध्यमातून सर्वांना द्या या खास शुभेच्छा.

'रोझा' ठेवणारी व्यक्ती पहाटे सूर्योदयापूर्वी जेवते तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर अन्न-पाणी घेतले जाते. इस्लाम धर्म पाळणार्‍यांना 'रोझा' ठेवणं त्याच्या धर्माच्या शिकवणीचा एक भाग आहे. मात्र यामध्ये लहान मुलं, आजारी व्यक्ती, लांबचा प्रवास करणारे, गरोदर महिला आणि मासिक पाळीच्या दिवसात सूट दिली जाते. स्वयंशिस्त, संयमाची परीक्षा पाहणारा हा यंदाचा रमजान तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद,घेऊन येवो हीच आमची प्रार्थना ! Ramadan 2020: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून.

रमजान मुबारक!

रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

रमजान मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा!

रमजान मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

रमजान मासारंभ निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा!

रमजान मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

रमजान मुबारक!

रमजान मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

रमजान मुबारक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स

व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपवर आता स्टिकर्सच्या माध्यमातूनही शुभेच्छा पाठवल्या जातात. गूगल प्ले स्टोअरवर तुम्हांला त्याची खास स्टीकर्स पॅक उपलब्ध आहेत. ती डाऊनलोड करूनही तुम्ही मेसेज, शुभेच्छा पाठवू शकता.

दरम्यान काल (22 एप्रिल) दिवशी इराक, बहरिन, सौदी अरेबियामध्ये रमजानसाठी चंद्रकोर दिसणं अपेक्षित होती. मात्र काल ती दिसू न शकल्याने आता आज (23 एप्रिल) पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान दक्षिण भारतामध्ये काल रात्री चंद्रकोर न दिसल्याने तेथे शुक्रवार (24 एप्रिल) पासून रमजान माहिना आणि रोझा ठेवण्याला सुरूवात होणार आहे.