Happy Raksha Bandhan 2019 Images: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणाचा स्नेह आणि उत्सवाचा दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भारताच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेस रक्षाबंधन सण साजरा केला जातो. भारताच्या विविध ठिकाणी या सणाला कजरी पौर्णिमा, राखीपौर्णिमा अशा नावांनी संबोधले जाते.
रक्षाबंधन साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा असून महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली होती.त्या जखमेतून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवाची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीचा किनार फाडून श्रीकृष्णाच्या रक्ताने माखलेल्या बोटाला बांधले. त्यावेळपासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले. तर रक्षाबंधनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या आपल्या भावाबहिणीला शुभेच्छा!
या सणाला दृष्टीपरिवर्तनाचा सण असेही म्हटले जाते. कारण यावेळी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते त्यावेळी त्याची दृष्टी बदलते. राखी बांधणाऱ्या बहिणीकडे पाहून तो आपव्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वत:कडे घेतो. आपल्या बहिणीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही पाहिजे, आपली बहिण समाजामध्ये ताठ मानेने वावरली पाहिजे याची जबाबदारी घेतो. परंतु राखी बांधण्यापूर्वी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते म्हणजेच शंकराप्रमाणे तिसरा डोळा असल्याचे त्याचा उल्लेख केला जातो. राखीचा धागा केवळ धागा, सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे.