Raksha Bandhan 2020 Mehndi Design: उद्या म्हणजेचं 3 ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. हा सण साजरा करण्यासाठी सर्वांच्या बहिणीची आजपासूनचं तयार सुरू झाली असेल. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस असतो. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या सणानिमित्त तुम्ही खालील मेहंदी डिझाईन्स काढून आपल्या हाताचं सौदर्यं अधिक खुलवू शकता. (हेही वाचा - Happy Raksha Bandhan 2020 Messages: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन राखी पौर्णिमेचा आनंद करा द्विगुणित!)
भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. मात्र, त्यानंतरच्या काळावधीत बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून या सणाची ओळख निर्माण झाली. रक्षाबंधनाच्या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.