दूरवर राहणाऱ्या भावाला काही तासांत 'या' मार्गाने रक्षाबंधनासाठी राखी पाठवा
Raksha Bandhan (Photo Credits-Facebook)

रक्षाबंधनाचा सण येत्या 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त सर्व बहिणींना भावाकडून काय गिफ्ट मिळेल याचा उत्सुकता लागून राहिलेली असते. मात्र जर तुमचा भाऊ दूरवर राहत असल्यास त्याला आता काही तासांत रक्षाबंधनानिमित्त राखी पाठवता येणर आहे. त्यासाठी आता सोशल मीडियावरील काही बेवसाईट तुमच्या भावाला राखी पाठवण्यास मदत करणार आहेत.

उद्या रक्षाबंधनाचा सण असून आता पर्यंत तुम्ही दूरवर राहणाऱ्या भावाला राखी पाठवली नसेल तर या मार्गाचा अवलंब करु शकता. यामुळे तुमच्या भावाला काही तासांच्या आतमध्ये तुम्ही पाठवलेली राखी मिळणार आहे.(Raksha Bandhan 2019 Wishes: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status)

Fernsnpetals-

बहिणाच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी Fernsnpetals वेबसाईट तुमच्या भावाला राखी पाठवण्यास मदत करणार आहेत. तसेच या संकेतस्थळावर राखीसोबत शानदार गिफ्ट, मिठाईसुद्धा तुमच्या भावाला पाठवू शकता.

Amazon Prime-

अॅमेझॉन प्राइमवर 10 रुपयांपासून ते 800 रुपयापर्यंत सुंदर राखी तुमच्या भावासाठी खरेदी करु शकता. तसेच पर्यावरणस्नेही संदेशासह तुम्हाला येथून राखी भावासाठी पाठवता येणार आहे.

Floweraura-

Floweraura या वेबसाईटवरुन तुम्हाला भारतात कुठेही राखी पाठवू शकता. तसेच राखीसोबत चॉकलेट, फ्लॉवर्स गुच्छ देता येणार आहेत.

My Flower Tree-

My Flower Tree येथून तुम्हाला भावाला 3 तासाच्या आतमध्ये राखी पाठवता येणार आहे. तसेच भावाचे तोंड गोड करण्यासाठी मिठाई-चॉकलेट्स सुद्धा गिफ्ट म्हणून देता येणार आहेत.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.