Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांनी केवळ शिवबांनाच घडवले नाही तर असंख्य महिलांनाही प्रेरणा दिली. आजही अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना दिसतात. आशा जिजाऊंची आज तारखेनुसार (12 जानेवारी) जयंती आहे. त्याच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी Facebook, Instagram, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आपण करु शकता. त्यासाठी शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, HD Images इथे देत आहोत.

राजतमाता जिजाऊ यांची तिथीनुसार जयंती नुकतीच साजरी झाली. तिथीनुसार साजरी होणारी जयंती ही 6 जानेवारीला असते. आपल्याकडे तिथी आणि तारीख हा वाद जुना असला तरी, जिजाऊंच्या प्रेमामुळे या दोन्ही दिवशी जयंती साजरी होते. तिथी माणनारे लोक तिथीनुसार जिजाऊ जयंती साजरी करतात. तारीख मानणारे तारखेनुसार जिजाऊ जयंती साजरी करतात.

Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2023 (File Image)

जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी झाला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज असलेले जाधवांच्या कुटुंबात जन्मलेल्या जिजाबाई यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी दौलताबाद येथे झाला. लहाणपणापासूनच जिजाबाई विविध गुणांसाठी ओळखल्या जात होत्या. त्या कुशल घोडेस्वार, सद्गुणी आणि शौर्यवान होत्या. त्या निष्णात तलवारबाजही होत्या. त्यामुळेच त्यांची छाप छत्रपती शिवरायांवर उमटली असावी असे सांगतात.