Rajmata Jijamata Jayanti 2021 HD Images: जीजाऊ जयंती निमित्त WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन करा राजमातेला अभिवादन!
Jijamata Jayanti 2021 HD Images | File Image

Rajmata Jijamata Jayanti 2021 Images in English: संस्कार, धैर्य, कर्तुत्व यांचा सुंदर मिलाफ असलेल्या जीजाबाई शहाजीराजे भोसले यांची आज जयंती. अवघ्या महाराष्ट्राच्या त्या जीजाऊ. त्यांची जयंती दरवर्षी राजमाता जीजाऊ जयंती म्हणून साजरी केली जाते. राजमाता जीजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी दौलताबाद येथे झाला. जीजाऊंच्या वडीलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. आज राजमाता जीजाऊंची जयंती. जयंतीनिमित्त जीजाऊंना अभिवादन करण्यासाठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, HD Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp) या माध्यमातून शेअर केले जातात. या शुभेच्छा देण्यासाठी भाषेचे बंधन नाही. त्यामुळे काही इंग्रजी शुभेच्छापत्रं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वाढवण्यात जीजाऊंची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका होती. जिजाबाईंचा शहाजीराजेंशी विवाह झाला. शहाजीराजे निजाम सुलतानाच्या दरबारी असल्याने बंगळुरात वास्तव्यास असल्याने शिवाजी महाराजांची जबाबदारी पूर्णपणे जीजाऊंवर होती आणि त्यांनी घडवलेले शिवाजी महाराजांची आपण आजही थोरवी गात आहोत. (Rajmata Jijabai Jayanti 2021 Messages: राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त खास मराठी HD Images, WhatsApp Status, Wishes शेअर करून द्या महान माऊलीला आदराजंली)

जीजाऊ जयंती शुभेच्छा!

Jijamata Jayanti 2021 HD Images | File Image
Jijamata Jayanti 2021 HD Images | File Image
Jijamata Jayanti 2021 HD Images | File Image
Jijamata Jayanti 2021 HD Images | File Image

| Rajmata महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे याठिकाणी जीजाऊ जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. छत्रपती 'शिवाजी महाराज की जय', 'राजमाता जीजाऊ की जय', 'जय जीजाऊ, जय शिवराय' अशा घोषणा देत मोठमोठ्या दिंड्या काढल्या जातात. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे नेहमीप्रमाणे जीजाऊ जयंती साजरी करण्यावर बंधनं आली आहेत. मात्र त्यांच्यातील एक गुण अंगिकारला तर तेच त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ठरेल.