
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी, या ओळीप्रमाणेच शिवरायांची तसेच शंभूराजांची पाळण्याची दोरी हाती घेऊन ज्या माऊलीने दोन महापुरुषांना घडवले अशा जिजाबाईंची आज जयंती (Rajmata Jijabai Jayanti). 12 जानेवारी 1595 मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जिजाबाईंचा जन्म झाला. लहानपणापासून कणखर पण तितकाच मायाळू असणारा जिजाबाईंचा स्वभाव पुढे जाऊन शहाजी राजेंसोबत संसार करताना, शिवाजी महाराजांना घडवताना, आणि रयतेला धीर देत राज्यकारभार करताना फायदेशीर ठरला. त्या दांडपट्टा अश्वारोहण आणि युद्ध कलांमध्येही पारंगत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवणाऱ्या जिजाऊ मॉंसाहेबांचे स्वराज्यतलेही योगदानही मोठे आहे.
जिजाबाईंचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला. त्यांना एकूण सहा’ अपत्ये होती. त्यापैकी चार मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. तर अशा या महान आईच्या जयंतीदिवशी HD Images, Whatsapp Status, Messages, Wishes शेअर करून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: 12 जानेवारीला राजमाता जिजाबाई जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार साजरी)




दरम्यान, पती व दुसरा मुलगा अनेक मैल दूर असताना खचून न जात जिजाऊंनी शहाजीराजांचे स्वराज्यस्वप्न उराशी बाळगले आणि शिवरायांमध्ये या स्वप्नाचे बीज अगदी लहानपणापासून पेरले. हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत शिवरायांच्या आणि समस्त मावळ्यांच्या पाठीशी त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या. शिवबांना त्यांनी दिलेली शिकवण आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.