Rajmata Jijabai Birth Anniversary: छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या राजमाता जिजाबाई भोसले (Rajmata Jijabai) या देखील महाराष्ट्रासाठी तितक्याच शिवरायां इतक्याच आदरनीय आहेत. दरम्यान जिजाबाई यांचा जन्मोत्सव दरवर्षी धूम धडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा तो अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडणार आहे. राजमाता जिजाऊ जयंती (Rajmata Jijau Jayanti) सोहळा दरवर्षी 12 जानेवारी ला ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. यंदा देखील त्यानिमित्ताने सिंदखेड राजा मध्ये तयारीला वेग आला आहे. Shiv Swaraj Din 2021: 'शिवराज्याभिषेक दिन' नव्हे राज्यात आता साजरा होणार 'शिवस्वराज्य दिन'.
जिजाबाईंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड नजीक देऊळगाव येथे झाला. लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्यापोटी जिजाऊंचा 12 जानेवारी 1598 साली जन्म झाला आहे. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज आहेत. पुढे शहाजी भोसलेंसोबत जिजाबाईंचा दौलताबाद जवळ विवाह झाला आणि लहान वयातच त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या येऊन पडल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यापासून ते जहागिरीचा कारभार सांभाळण्याच्या सार्या जबाबदार्या त्यांनी एकटीने उत्तमप्रकारे सांभाळल्या होत्या. त्यांच्या कणखर स्वभावाचे शिवरायांवरही संस्कार झाले.
जिजाऊ जयंती 2021 सेलिब्रेशन
जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच सिंदखेड राजा मध्ये मराठा सेवा संघातर्फे सर्वात मोठा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो यंदादेखील तो आहे मात्र त्याचं रूप सौम्य आहे. जिजाऊ सृष्टी परिसर दिव्यांनी झगमगण्यास सुरूवात झाली आहे. तर यंदा मराठा सेवा संघातर्फे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यंदा कोरोनाचं सावट असल्याने जिजामाता यांच्या जन्मस्थळाला सर्वांसाठी खुले करण्यात आलेले नाही. दरम्यान ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालेले जिजाऊ जन्मस्थान पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली आहे.