Raigad Shivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात; Live Streaming च्या माध्यमातून पुन्हा अनुभवा गतवर्षीचा उत्साह (Watch Video)
शिवराज्याभिषेक सोहळा। Photo Credits: Twitter @YuvrajSambhaji

आज 6 जून रोजी सकाळपासून रायगड (Raigad) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 347 व्या शिवराज्यभिषेक दिनाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. यंदा कोरोनाचे संकट पाहता हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि गर्दी न करता साजरा केला जाणार आहे. तरीही शिवभक्तांचा उत्साह लक्षात घेऊन रायगडावरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करणार असल्याचा शब्द छत्रपती संभाजी राजे (Chhatrapti Sambhai Raje)  यांनी दिला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या मागील वर्षाचे प्रक्षेपण आता सकाळी 9 वाजल्यापासून केले जात आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने तोच जोश, तोच उत्साह, तोच क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असे म्हणत संभाजी राजे यांनी शिवभक्तांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.Shivrajyabhishek Sohala 2020 Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मराठी संदेश,  Facebook, WhatsApp वर शेअर करून शिवरायांना द्या मानवंदना!

एकीकडे कोरोनाचे संकट प्रबळ असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisaraga Cyclone)  रायगड जिल्ह्यातील अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, मोबाईलच्या टॉवरची अवस्था सुद्धा बिघडल्याने रेंज ची सुद्धा समस्या आहे, मात्र काहीही झाले तरी हा सोहळा प्रतीकला पाहता येणारच असा ठाम विश्वास छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या पोस्टमधून वर्तवला आहे.

शिवराज्यभिषेक सोहळा लाईव्ह 

दरम्यान, आज सकाळपासून सोशल मीडीवर अनेक नेत्यांनी व शिवभक्तांनी या सोहळ्याचे डिजिटल सेलिब्रेशन सुरु केले आहे. ट्विटर, फेसबुक च्या माध्यमातून अनेकांनी शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा शेअर करत सर्वांच्याच लाडक्या राजाला मानवंदना केली आहे.