
Propose Day 2021: रोज डे पासूनच व्हेलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (8 फेब्रुवारी) असणाऱ्या प्रपोज डे च्या दिवशी आपल्या पार्टनरला मनातील भावना सांगण्यासाठी खास दिवस आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रत्येक दिवस खासच असतो. परंतु फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या व्हेलेंटाईन वीक हा त्या पेक्षा ही अधिक खास पद्धतीने साजरा करण्यासह आनंदात घालवला जातो. 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा होण्यापूर्वी विविध डे साजरे केले जातात. तर रोज डे च्या दिवशी जसे गुलाबाचे फुल दिले जाते तर प्रपोज डे च्या दिवशी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला मनातील भावना व्यक्त करत प्रेमाची कबुली देतो.
प्रपोज डे च्या दिवशी कपल्स एकमेकांना गिफ्ट तर देतातच पण माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगण्यास विसरत नाही. परंतु जर तुम्ही प्रपोज डे च्या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देण्यास घाबरत असाल तर हे काही मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेट्स, वॉलपेपर्स तुमची मदत करतील. त्यामुळे तु्म्हाला काही न बोलताच फक्त एका मेसेजच्या माध्यमातून आपले प्रेम समोरच्या व्यक्तीवर व्यक्त करता येईल. (Chocolate Day 2021 Gift Ideas: यंदाच्या चॉकलेट डे ला 'ही' खास गिफ्ट्स देऊन करा तुमच्या व्हॅलेन्टाईनला सरप्राईज!)
डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षात आण
किती प्रेम करतो तुझ्यावर हे न सांगताही जाण
हॅप्पी प्रपोज डे!

बंध जुळले असता मनाच नातही जुळायला हवं
अगदी स्पर्शातून ही सार कळायला हवं
हॅप्पी प्रपोज डे!

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षा ही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
हॅप्पी प्रपोज डे!

होकार द्यायचा की नाही ते तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावरच शेवट पर्यंत करेन
हॅप्पी प्रपोज डे!

तुझ माझं नात असं असावे
जे शब्दांच्या पलीकडे उमगावं
हॅप्पी प्रपोज डे!

दरम्यान, पार्टनरला प्रपोज करण्यासाठी महागडे गिफ्ट देण्याची किंवा सरप्राइज देण्याची गरज नाही. पण प्रपोज करताना तुम्ही पार्टनरला तुमच्या शब्दांनी मोहून टाकल्यास तुम्हाला नक्कीच होकार मिळेल. तसेच पार्टनरच्या भावनांचा आदर करण्याचा सुद्धा नेहमीच विचार करा. तर प्रपोजडे निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा.