Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

Promise Day 2021 Wishes: व्हॅलेंटाईन सप्ताहाचा (Valentine Week) प्रत्येक दिवस खूप खास असतो. या आठवड्यातील पाचवा दिवस 'प्रॉमिस डे' (Promise Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तुमच्या प्रेमास अधिक बळकट होण्यास मदत करतो. प्रॉमिस डे च्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदाराला आपल्या प्रेमाची कल्पना देऊ शकता. हा दिवस आपल्या जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचा दिवस आहे. या दिवशी जोडपे एकमेकांना कधीही सोडणार नाहीत, कधीही दुःख देणार नाहीत, आयुष्यभर सोबत राहू, असं वचन देत असतात. आपणही या दिवशी आपल्या जोडीदारास असं वचन देऊ शकता.

प्रॉमिस डे च्या दिवशी अनेक जोडपे एकमेकांना काहीतरी वचन देत असतात. त्यामुळे हा दिवस प्रेमी युगलांसाठी खास असतो. या दिवशी तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता, असं वचन आपल्या जोडीदाराला देऊ शकता. याशिवाय 'प्रॉमिस डे' निमित्त Messages Greetings, Facebook & Whatsapp Status च्या माध्यमातून तुम्ही आपल्या जोडीदाराला खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. या शुभेच्छा आणि वचन ऐकून तुमचा जोडीदार नक्कीचं खूश होईल. (वाचा - Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!)

मी वचन देतो की,

जीवनातल्या कोणत्याही क्षणी,

तुला कधीही सोडणार नाही,

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

मला सर्वांपेक्षा महान व्हायचं आहे,

मी हे सर्व करु शकतो.

माझी इच्छा आहे की, तू मला प्रॉमिस दे,

यू आर द ग्रेटेस्ट ऑफ यू.

प्रॉमिस डे च्या खूप खूप शुभेच्छा

Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

तू माझ्यासाठी बेस्ट आहेस

त्यामुळे तू कायम माझ्यासोबत रहा,

आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

तू आनंदासाठी माझी लॉटरी आहेस.

देवाचे आभार मानून मी ते जिंकले आहे.

मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम

आणि काळजी घेण्याचं प्रॉमिस करतो!

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

जेव्हा आपण एखाद्या प्रिय

व्यक्तीला चांगलं प्रॉमिस देत असता

तेव्हा आपण आपले नाते दृढ आणि

आनंदी बनवत असतो!

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Promise Day 2021 Wishes (PC - File Photo)

प्रॉमिस डे निमित्त तुम्ही आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तूदेखील गिफ्ट करू शकता. व्हॅलेंटाईन सप्ताह प्रेमी युगलांसाठी खास असतो. हा सप्ताह दरवर्षी 7 फेब्रुवारी फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो. प्रॉमिस डे च्या दिवशी सर्वजण आपल्या जोडीदाराला वचन देतात.